
शिरसी (कर्नाटक) – भाजपचे कार्यकतर्ते प्रवीण नेट्टारू यांच्या हत्या प्रकरणात आरोपींना गुप्त प्रशिक्षण दिल्याचा आरोप असलेला मौसीन शुकूर होन्नावर याला शिरसी पोलिसांनी नुकतीच अटक केली. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) आरोपी मौसीन शुकूर होन्नावर याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंदवल्यानंतर तो गेल्या ६ वर्षांपासून पसार झाला होता. मौसीन शुकूर होन्नावर हा बंगळूरमधील केजी हळ्ळी-डीजे हळ्ळी दंगल प्रकरणात आरोपी असून तो बंदी घालण्यात आलेल्या ‘पी.एफ्.आय.’ संघटनेचा उत्तर कन्नड जिल्ह्याचा अध्यक्षही आहे.

१. उत्तर कन्नड जिल्ह्यातील शिरसीचा रहिवासी असलेला ‘मोस्ट वॉन्टेड’ गुन्हेगार मौसीन उपाख्य इम्तियाज शुकूर होन्नावर याला विजापूर जिल्ह्यातील सिंदगी येथे कुटुंबासमवेत फिरण्यासाठी गेला असतांना पोलिसांनी कह्यात घेतले.
२. आरोपी शुकूर भाग्यनगरमध्ये रहात होता. तो अधून-मधून पोलीस आणि गुप्तचर विभाग यांना चकवा देऊन शिरसीला ये-जा करत असे. त्यामुळे शिरसीतील त्याच्या पत्नीला अवघ्या ६ वर्षात ५ मुले झाली.
३. प्रवीण नेट्टारू हत्या प्रकरण आणि इतर अनेक आतंकवादी कृत्ये यांमध्ये शुकूरचा सहभाग असल्याने ‘एन्.आय.ए.’ आणि केंद्रीय गुप्तचर विभाग त्याचा शोध घेत होते. (अशा आरोपीला पकडण्यासाठी ६ वर्षे लागणे, हे अन्वेषण यंत्रणेचे अपयश म्हणायचे का ? – संपादक)