अटकेतील मुसलमानांच्या सुटकेसाठी महिला आयोगाच्या सदस्यांची गाडी अडवून मुसलमान महिलांची निदर्शने !

दावणगेरे (कर्नाटक) येथे मुसलमान गटाने २ हिंदु महिलांवर आक्रमण केल्याचे प्रकरण !

पीडित महिलांचे सांत्वन करताना डॉ. अर्चना मुजुमदार

दावणगेरे (कर्नाटक) – जिल्ह्यातील तावरेकेरे येथील जामिया मशिदीसमोर मुसलमानांच्या गटाने २ हिंदु महिलांवर जीवघेणे आक्रमण केले होते. या प्रकरणी पोलिसांनी ६ मुसलमानांना अटक केली आहे. गावात हिंदु महिलांवर झालेल्या अमानुष आक्रमणाच्या प्रकरणी महिला आयोगाच्या सदस्या डॉ. अर्चना मुजुमदार या तपास करण्यासाठी गावात पोचल्या होत्या. त्यांनी पीडित महिलांचे सांत्वन केले आणि तेथून प्रयाण केले. या वेळी मुसलमान महिलांनी त्यांची गाडी अडवली आणि काही वेळ निदर्शने करत अटकेत असलेल्या मुसलमान आरोपींना मुक्त करण्याची मागणी केली. (झुंडशाहीचा वापर करून पोलिसांवर दबाव आणणार्‍या मुसलमान महिला ! – संपादक)

काही दिवसांपूर्वी दोन हिंदु महिलांवर मुस्लीम समुदायाच्या गटाने तावरेकेरे येथील जामिया मशिदीसमोर आक्रमण करून त्यांना घायाळ केले होते. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमावर प्रसारित झाल्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाने स्वत:हून नोंद घेऊन  तक्रार दाखल केली होती आणि डॉ. अर्चना मुजुमदार या तपासासाठी तावरेकेरे येथे पोचल्या होत्या

संपादकीय भूमिका

धर्मांध आणि गुन्हेगार मुसलमानांच्या पाठीशी उभ्या रहाणार्‍या मुसलमान महिला ! भारतात बर्‍याच ठिकाणी दंगलीच्या वेळी मुसलमान महिला दगडफेक करण्यात पुढे असतात, हे लक्षात घ्या ! अशा मुसलमान महिलांना कोणतीही दयामाया न दाखवता कायद्यान्वये शिक्षा करणे आवश्यक !