Mangaluru Doctor Faces FIR : ‘मी भारताचा द्वेष करते’, अशी पोस्ट करणार्‍या कर्नाटकातील मुसलमान महिला डॉक्टरला रुग्णालयाने काढून टाकले !

मंगळुरू (कर्नाटक) – ‘घाणेरडे हिंदू माझ्या मागे लागले आहेत. मी भारतीय आहे, मी भारताचा द्वेष करते,’ असे देशद्रोही आणि हिंदुविरोधी लिखाण दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मंगळुरू येथील डॉ. अफिफा फातिमा यांनी सामाजिक माध्यमावर एका पोस्टद्वारे प्रसारित केले आहे.

काश्मीरमधील पहलगाम आक्रमणानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणावपूर्ण परिस्थिती असतांनाच एका मुसलमान डॉक्टरने अशा प्रकारे पोस्ट केल्यामुळे हिंदु संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. तिला रुग्णालयाने काढून टाकले आहे.

१. या प्रकरणी मंगळुरूमधील हायलँड रुग्णालयातील डॉक्टर अफिफा फातिमा हिच्या विरोधात मंगळुरू शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

२. डॉक्टर अफिफा फातिमा हिच्या पोस्टवर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होताच, हायलँड रुग्णालय व्यवस्थापनाने तिला कामावरून काढून टाकले. त्यानंतर रुग्णालयाच्या अधिकार्‍याने त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली.

३. डॉक्टर अफिफा फातिमा यांच्या देशद्रोही आणि हिंदुविरोधी लिखाणाची मंगळुरू  पोलिसांनी गांभीर्याने नोंद घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी विश्व हिंदु परिषदेचे नेते शरण कुमार पंपवेल यांनी केली आहे.

संपादकीय भूमिका

  • भारतात राहून भारताचाच द्वेष करत असल्याचे ढळढळीतपणे सांगणार्‍या या मुसलमानांमध्ये एवढे धारिष्ट्य येते कुठून ? अशांना कठोर शिक्षा करून ती भोगून झाल्यावर पाकिस्तानात हाकलणे आवश्यक !
  • कर्नाटकात काँग्रेस सरकार असल्यामुळे अशांवर कारवाई होईल, अशी अपेक्षा नाही !