Canada Election : कॅनडामधील निवडणुकीत खलिस्तानी समर्थक जगमीत सिंह आणि त्याचा पक्ष यांचा दारूण पराभव !

खलिस्तानी समर्थक जममीत सिंह

ओटावा (कॅनडा) – कॅनडाच्या सार्वत्रिक निवडणुकीत खलिस्तान समर्थक जगमीत सिंह आणि त्याचा पक्ष यांचा दारूण पराभव झाला आहे. पराभवानंतर जगमीत सिंह याने पक्षाच्या अध्यक्षपदाचे त्यागपत्र दिले आहे. त्याच्या पक्षाला केवळ ७ जागा मिळाल्या आहेत. मागील निवडणुकीत या पक्षाला २५ जागा मिळाल्या होत्या.

पराभवानंतर जगमीत सिंह म्हणाला की, मी खलिस्तानी चळवळीला दुर्बल होऊ देणार नाही. जनतेने मात्र या चळवळीचा स्वीकार केला नाही. मी निराश झालो आहे; परंतु यापुढेही मी प्रयत्न करत रहाणार आहे.

कॅनडात मार्क कार्नी पुन्हा पंतप्रधान होणार

मार्क कार्नी

कॅनडातील निवडणुकीत जस्टिन ट्रूडो यांचा लिबरल पक्ष पुन्हा सत्तेवर येणार आहे. या निवडणुकीत त्यांचा पक्ष १६६ जागांवर विजय मिळवत असल्याचे दिसून येत आहे. कॅनडात सरकार बनवण्यासाठी १७२ खासदारांची आवश्यकता आहे. त्यासाठी केवळ ९ जागा ट्रूडो यांच्या पक्षाला हव्या आहेत. या पक्षाचे आणि सध्या पंतप्रधानपदी असणारे मार्क कार्नी हेच पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. या निवडणुकीत विरोधी पक्ष असलेल्या कंझरव्हेटीव्ह पक्षाला १४५ जागा मिळत आहे. हा पक्ष सत्तेपासून खूप लांब आहे.