पटसंख्येअभावी मुंबईतील नाबर गुरुजी विद्यालय बंद होणार !

मुंबई – दादर येथील इंडियन एज्युकेशन सोसायटीचे नाबर गुरुजी विद्यालय १ मे २०२५ पासून बंद होणार आहे. पटसंख्येच्या अभावी शाळा व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे. या शाळेत यंदा दहावीला केवळ २४ विद्यार्थी होते, तर इयत्ता आठवीत ९ आणि नववीत ९ असे १८ विद्यार्थी उरले आहेत. त्यामुळे वरील निर्णय घेण्यात आला.