Gujarat Bulldozer Action : कर्णावती येथे बांगलादेशी घुसखोरांच्या बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई

कर्णावती (गुजरात) – येथील शाह आलम परिसराजवळील चांडोला तलाव परिसरात बांगलादेशी घुसखोरांच्या बेकायदेशीर बांधकामांवर बुलडोझर कारवाई चालू झाली आहे. येथे ५० बुलडोझर तैनात करण्यात आले आहेत. या कारवाईच्या विरोधात गुजरात उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे. ‘कायदेशीर प्रक्रिया आणि नियमांचे पालन न करता हे पाडकाम केले जात आहे’, असा दावा रहिवाशांनी न्यायालयात केला आहे. ‘येथे रहाणारे लोक बांगलादेशी आहेत हे सिद्ध करण्यासाठी कोणतेही ठोस पुरावे सादर केलेले नाहीत’, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला.

गेल्या २ दिवसांत पोलिसांनी या भागातून ८९० संशयितांना कह्यात घेतले आहे. यापैकी १४३ जण बांगलादेशी नागरिक म्हणून ओळखले गेले आहेत. पहलगाम येथील आक्रमणानंतर ही कारवाई चालू करण्यात आली.

संपादकीय भूमिका

मुळात बांगलादेशी घुसखोर येथे बांधकाम करेपर्यंत प्रशासन आणि पोलीस झोपले होते का ?