कल्याण येथे पहलगाम पीडितांच्या श्रद्धांजली पोस्टवर ‘केळीचे चिन्ह’ दाखवून अवमान !

कल्याण – व्हॉट्सॲपवर पहलगाम आतंकवादी आक्रमणातील मृत व्यक्तींच्या श्रद्धांजली ‘पोस्ट’मध्ये केळीचे चिन्ह प्रसारित केले. अशा कृतीद्वारे कल्याणमधील मुसलमान शकील शेख याने मृत हिंदु बांधवांचा जाहीर अवमान केला. या प्रकरणी धार्मिक तेढ निर्माण करणार्‍या या धर्मांधावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गटातील सदस्यांनी पोलिसांकडे केली आहे; मात्र पोलिसांनी अनेक घंट्यांनंतर केवळ अदखलपात्र गुन्हा नोंदवला. (नागरिकांच्या मागणीनंतर कृती करणारे पोलीस काय कामाचे ? – संपादक)

‘खबर बात ३६० न्यूज नेटवर्क रायगड’ या गटावर २७ एप्रिलला राहुल कुमार यांनी पहलगाम आक्रमणातील हिंदूंना श्रद्धांजलीविषयीची पोस्ट प्रसारित केली होती; पण शकील शेख याने पोस्टचा अनादर करत केळीचे चिन्ह (इमोजी) टाकले. पोलिसांनी अद्याप कारवाई करण्याचे ठोस आश्वासन दिलेले नाही.

संपादकीय भूमिका

अशा धर्मांधांना कारागृहातच डांबायला हवे !