भारत आणि पाक यांनी संयम बाळगावा ! – Deputy Foreign Minister of Russia

रशियाच्या उपपरराष्ट्रमंत्र्यांचा सल्ला

रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री आंद्रेई रुडेन्को व भारतीय राजदूत विनय कुमार

मॉस्को (रशिया) – पहलगाम येथील आक्रमणानंतर रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री आंद्रेई रुडेन्को यांनी रशियातील भारताच्या राजदूतांची भेट घेतली. रशियाने भारतासह जागतिक आतंकवादाच्या धोक्याला योग्य उत्तर देण्यासाठी पूर्णपणे सिद्ध असल्याचे घोषित केले होते.

भारतीय राजदूत विनय कुमार यांनी ताज्या परिस्थितीची माहिती रशियाच्या पपरराष्ट्रमंत्र्यांना दिली. रशियाच्या या कृतीमुळे पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही रशियाच्या उपपरराष्ट्रमंत्र्यांना भेटण्यासाठी दूत पाठवला. रशियाने निवेदनात म्हटले आहे की, उपपरराष्ट्रमंत्र्यांनी दोन्ही बाजूंना संयम बाळगण्यास सांगितले आहे.

संपादकीय भूमिका

जे रशियाने युक्रेनसमवेत केले, तेच भारत पाकसमवेत करणार आहे, हे रशियाने लक्षात घ्यावे !