Indore Youth beaten By Muslims : रेल्वेमध्ये पहलगाम येथील आक्रमणाचे व्हिडिओ पहाणार्‍या हिंदु तरुणाला मुसलमानांकडून मारहाण

ठार मारण्याचीही दिली धमकी

इंदूर (मध्यप्रदेश) – येथे पहलगाम येथील जिहादी आतंकवादी आक्रमणाचे व्हिडिओ पहाणार्‍या हिंदु तरुणाला काही मुसलमानांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

१. शुजालपूरमध्ये रहाणारा हा हिंदु तरुण इंदूरमध्ये शिक्षण घेतो. तो इंदूर-भोपाळ पॅसेंजर ट्रेनच्या जनरल डब्यातून प्रवास करत होता. प्रवासाच्या वेळी तो पहलगाम येथील जिहादी आतंकवादी आक्रमणाचे व्हिडिओ पहात होता. याचवेळी त्याला मुसलमान तरुणांनी घेरले आणि विचारले, ‘आम्हाला बघून व्हिडिओ पहात आहेस का ?’ यानंतर त्यांनी या हिंदु तरुणाला शिवीगाळ करत मारहाण केली.

२. या वेळी हा तरुण मुसलमानांना म्हणाला की, ‘तुम्हीही याच देशात रहाता.’ त्यावर ‘ही देशभक्ती रेल्वेमध्ये दाखवू नको. रेल्वेमधून खाली उतर, नाही तर २९ वा क्रमांक (पहलगाममध्ये आतंकवाद्यांनी २८ हिंदु पर्यटकांना ठार मारले होते.) तुझा असेल’, अशी धमकी या मुसलमानांनी त्याला दिली.

३. जेव्हा हिंदु विद्यार्थ्याने त्यांना विरोध केला, तेव्हा मुसलमानांनी त्याला मारहाण केली. या तरुणाने रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली आहे. मारहाणीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. मारहाण करणारे २० जण होते आणि त्यांचा आता शोध घेतला जात आहे.

४. ‘आम्ही चंदननगरला रहातो. तिथे आमचा वेगळा देश आहे. तिथे आमचा कायदा चालतो,’ अशी धमकी या मुसलमानांनी या तरुणाला दिली होती. चंदननगर हा मुसलमानबहुल भाग आहे.

संपादकीय भूमिका

देशांतर्गत राष्ट्रप्रेमी नागरिकांना आता स्वसंरणार्थ सरकारमान्य शस्त्रे हातात घ्यावी लागण्याची वेळ आल्याचीच ही घटना निदर्शक आहे !