
वेल्हा (पुणे) – राजगड किल्ला (ता. राजगड) संरक्षित क्षेत्राच्या हद्दीमध्ये विनाअनुमती चौथर्याचे बांधकाम करून त्यावर मेघडंबरी (छत्री) बसवली. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवल्याच्या प्रकरणी ‘हिंदु बांधव सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संघटने’चे रवींद्र पडवळ यांच्यासह २५ ते ३० अज्ञात सदस्यांच्या विरोधात वेल्हे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना २६ ते २७ एप्रिल या कालावधीमध्ये घडली आहे. या प्रकरणी पुरातत्व विभागाचे कर्मचारी बापू साबळे यांनी वेल्हे पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक नितीन खामगळ यांनी दिली.