पुणे – येथील कोंढव्यात दिवसाढवळ्या गोळीबाराची घटना समोर आली आहे. परिसरातील शालिनी कॉटेज साळुंके विहार रस्ता येथील श्रीकांत कानडे यांच्या रहात्या घराच्या काचेवर गोळीबार झाल्याचे समोर येत आहे. सुदैवाने या गोळीबारात कुणीही घायाळ झालेले नाही. गोळीबार झाला, त्या वेळी घरात ३ लोक होते. बिलाल जुल्फीकार शेख याने एअर रायफलमधून ५ राऊंड फायर केल्याचे समजते. पोलिसांनी शेख याला बंदुकीसह कह्यात घेतले. या गोळीबाराचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी अन्वेषण चालू आहे.
संपादकीय भूमिकाधर्मांध एका हिंदूच्या घरावर दिवसा गोळीबार करतो, यातून कायदा-सुव्यवस्था आणि पोलिसांचा धाक संपला, हेच लक्षात येते. |