बंगाल येथे राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी ‘हमारा देश’ संघटनेच्या वतीने बेळगाव येथे आंदोलन !

‘हमारा देश’ संघटनेच्या वतीने बेळगाव येथे आंदोलन करताना कार्यकर्ते

बेळगाव – बंगाल येथे राष्ट्रपती राजवट लावा, या मागणीसाठी ‘हमारा देश’ संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. ‘पहिले रेल्वे गेट’ येथून आंदोलन फेरीला प्रारंभ करण्यात आला. तेथून देशमुख रस्त्यावरून जाऊन ‘आर्.पी.डी. कॉर्नर’ या ठिकाणी निदर्शने करण्यात आली. या वेळी जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे घडलेल्या घटनेचा निषेध करून मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वहाण्यात आली.

या प्रसंगी ‘हमारा देश’चे श्री. व्यंकटेश शिंदे, माजी उपमहापौर श्री. आनंद चव्हाण, सर्वश्री अजित पाटील, संदीप भिडे, सम्राट गोडसे, प्रसाद वेर्णेकर, मुकेश वेर्णेकर, नागेश कांबळे, शशिकांत घाटगे, मल्लिकार्जुन कोकणी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. हृषिकेश गुर्जर यांसह अन्य सहभागी झाले होते.