पुसेगाव आणि लोणंद (जिल्हा सातारा) येथे निषेध मोर्चा !

संग्रहित छायाचित्र

सातारा, २८ एप्रिल (वार्ता.) – जिल्ह्यातील शिरवळ, पुसेगाव आणि लोणंद या ठिकाणी पहलगाम आतंकवादी आक्रमणाच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला हिंदुत्वनिष्ठांसह समाजातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नागरिकांनी ‘भारतमाता की जय’, ‘वन्दे मातरम्’, या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.

काही ठिकाणी पाकिस्तानच्या झेंड्याचे दहन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी पोलीस अन् प्रशासकीय अधिकारी यांना निवेदन देत पाकपुरस्कृत आतंकवादी आणि पाकिस्तानवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. आतंकवादी आक्रमणामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.