मुंबईत सिमेंट ब्लॉक बनवणार्‍या आस्थापनात अमली पदार्थ बनवण्याचा कारखाना 

  • तिघे अटकेत !

  • ८ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त, साकीनाका पोलिसांची मोठी कारवाई

मुंबई – येथील साकीनाका पोलिसांनी अमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई करत ८ कोटी रुपयांचा एम्डी हा अमली पदार्थ जप्त केला आहे. वसई कामन गाव परिसरात एम्के ग्रीन सिमेंट ब्लॉक बनवणार्‍या आस्थापनात ‘एम्डी’ हा अमली पदार्थ बनवणार्‍या कारखान्यातील संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. सादिक शेख, सिराज पंजवाणी आणि सय्यद इराणी अशी त्यांची नावे असून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुख्य आरोपी फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

संपादकीय भूमिका

समाजाला व्यसनाधीन आणि त्याद्वारे उद्ध्वस्त करण्याचे षड्यंत्र रचणार्‍यांना कठोर शिक्षाच व्हायला हवी !