जामडूल, आचरा येथे चोरीच्या प्रकरणी मुसलमानाला पोलीस कोठडी

प्रतीकात्मक चित्र

मालवण – तालुक्यातील आचरा जामडूल येथे एका घरात कुणी नसल्याचे पाहून अज्ञात चोराने २५ एप्रिल या दिवशी घरातील सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम मिळून ५ लाख ६८ सहस्र ५४० रुपयांचा मुद्देमाल चोरला होता. या प्रकरणी फरान युसुफ मुजावर (आचरा जामडूल) यांनी शनिवार, २६ एप्रिलला त्यांच्या घरात चोरी झाल्याची तक्रार दिली होती. यात त्यांनी शेजारच्या व्यक्तीवर संशय व्यक्त केला होता. त्यानुसार पोलिसांनी संशयित नौफिल हुसेन मुजावर (रहाणार, आचरा जामडूल) याला अटक केली. त्यानंतर येथील न्यायालयाने नौफिल याला २ मेपर्यंत पोलीस कोठडी बजावली आहे.