लैंगिक अत्याचाराला विरोध केल्याने अल्पवयीन मुलीची डोक्यात दगड घालून हत्या !

  • नवी मुंबईतील घटना !

  • आरोपीही अल्पवयीनच ! 

नवी मुंबई – तुर्भे येथे १२ वर्षांच्या मुलीची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली. हत्या करणारा आरोपी १७ वर्षांचा अल्पवयीन आहे. तुर्भे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. प्राथमिक चौकशीत भांडणातून हत्या केल्याचे आरोपीने मान्य केले आहे. दोघेजण डोंगराळ भागात छायाचित्रे काढण्यासाठी गेले होते. तेथे मुलाने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तिने प्रतिकार केल्याने दोघांमध्ये वाद झाला. त्यातूनच आरोपीने तिची हत्या केली.

संपादकीय भूमिका

अल्पवयिनांमध्येही वासनांधता किती मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे, हे दर्शवणारी घटना ! त्यातूनच विकृतताही बळावत आहे. हे रोखण्यासाठी अल्पवयिनांनाही शिक्षा करायला हवी !