विक्रोळी येथे समान दिनांकाच्या आधारकार्डाचे १३ बांगलादेशी सापडले !

महाराष्ट्रात बांगलादेशींना वसवणारी टोळी कार्यरत असण्याची शक्यता !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – विक्रोळीमध्ये ‘१ जानेवारी’ हा एकच दिनांक असलेल्या आधारकार्डाचे १३ बांगलादेशी सापडले आहेत. या सर्वांना पोलिसांनी कह्यात घेतले असून त्यांचे अन्वेषण चालू आहे. विशेष म्हणजे या सर्वांच्या आधारकार्डांवर ‘साहेबगंज, झारखंड’ हा एकच पत्ता आहे. यावरून या बांगलादेशींना मुंबईत वसवण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न होत आहेत आणि ते करणार्‍यांची टोळी कार्यरत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

विक्रोळी येथील सामाजिक कार्यकर्ते विनायक कामथ, युवराज मोरे, गणेश शेट्टी आणि केतकी सांगळे हे २७ एप्रिल या दिवशी विक्रोळी बाजारपेठेत गेले असतांना तेथे अनेक संशयित फेरीवाले आढळले. याविषयी त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी संशयितांची चौकशी केली असता त्यांच्याकडे एकसमान दिनांक असलेली आधारकार्ड आढळली. ही आधारकार्ड कुणी बनवून दिली, याविषयी पोलीस शोध घेत आहेत. जियाऊल शेख, अयुब शेख, मनोरूल शेख, सायम शेख, नईम शेख, सामून शेख, रफीकुल शेख, जहाँगीर शेख, नसीमा बिबी, मैनुद्दीन शेख अशी या बांगलादेशींची नावे आहेत.