कलियुगातील एकमेवाद्वितीय गुरु ।

‘आज सकाळी व्यायाम करतांना मी श्री गुरुचरणी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी) प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करत श्री गुरूंना आळवत होतो. त्या वेळी श्री गुरूंच्या जन्मोत्सवाचे दृश्य माझ्या डोळ्यांसमोर आले. या भावदृश्याने काही काव्यपंक्ती माझ्या मनःपटलावर उमटल्या. त्या येथे दिल्या आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

लगबग आहे चालू सनातनच्या आश्रमात ।
सांगे श्री गुरूंचा (टीप) जन्मोत्सव सोहळा होणार साक्षात् ।। १ ।।

श्री. अविनाश जाधव

कलियुगातील एकमेवाद्वितीय गुरु ।
आहेत श्रीविष्णु स्वरूप परात्पर गुरु ।। २ ।।

या अवनीवर त्यांची सर नाही कुणा ।
आजपर्यंतच्या घटना दर्शवतात त्या खुणा ।। ३ ।।

साधकांनो, चला ज्योतसे ज्योत लावू ।
पृथ्वीवरील दाही दिशा उजळून टाकू ।। ४ ।।

या शुभदिनी रंगांची उधळण करू ।
सारा आसमंत चैतन्याने रंगीबेरंगी करू ।। ५ ।।

श्री गुरूंच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधू ।
त्यांचे गुण अन् कार्य त्रिभुवनात पोचवू ।। ६ ।।

धन्य आम्ही साधक जन, लाभले गुरु महान ।
अनुभवत आहोत श्री गुरुकृपेचा महिमा अपार ।। ७ ।।

सदैव राहो श्री गुरूंच्या कृपाछत्राखाली  ।
हीच प्रार्थना श्री गुरूंच्या पावन चरणी’ ।। ८ ।।

टीप : परात्पर गुरु डॉ. आठवले

– श्री. अविनाश जाधव (वर्ष २०२४ मधील आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.४.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक