
वॉशिंग्टन – अमेरिकेची मुख्य अन्वेषण संस्था ‘एफ्.बी.आय.’चे (‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’चे) प्रमुख काश (कश्यप) पटेल यांनी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणाचा निषेध केला आहे. तसेच या प्रकरणी भारताला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
काश पटेल म्हणाले की, २२ एप्रिल या दिवशी झालेल्या आतंकवादी आक्रमणात २८ निष्पाप लोकांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्या व्यक्तींची सुंता झाली आहे कि नाही, हे तपासण्यासाठी त्यांची पँट उतरवण्यात आली, त्यांना कलमा (अल्लाचा गौरव करणारी विधाने) म्हणण्यास सांगण्यात आले आणि त्यांची ओळखपत्रे तपासण्यात आली. आतंकवाद्यांनी पीडितांची हिंदु ओळख पटवून त्यांची हत्या केली. ही घटना पुन्हा एकदा आपल्याला आतंकवादाच्या दुष्ट प्रभावापासून जगाला असलेल्या धोक्याची आठवण करून देते. काश पटेल हे भारतीय वंशाचे आहेत आणि डॉनल्ड ट्रम्प पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांची या पदावर नियुक्ती झाली आहे.