Khalistani Terrorist Pannun Threat : (म्हणे) ‘२ कोटी शीख भारतीय सैन्याला पंजाबमधून पाकवर आक्रमण करू देणार नाहीत !’ – खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू

अमेरिका पुरस्कृत खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याची धमकी

खलिस्तानी आतंकवादी गुरुपतवंत सिंह पन्नू

वॉशिंग्टन (अमेरिका) – २ कोटी शीख पाकिस्तानसमवेत दगडासारखे उभे आहेत. भारतीय सैन्याला पंजाबमधून पाकिस्तानवर आक्रमण करण्याची अनुमती दिली जाणार नाही, अशी धमकी अमेरिकापुरस्कृत खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याने दिली. त्याने पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांना धमकी देतांना म्हटले की, ‘त्यांना इंदिरा गांधी यांच्यासारखे नशिब येऊ शकते.’ पन्नू याने पहलगाममधील आतंकवादी काश्मीरमध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी आणि निवडणुकीत लाभ मिळवण्यासाठी भारताने रचलेले नाटक असल्याचा आरोप केला आहे.

यावर देहलीतील भाजप सरकारचे मंत्री मनजिंदर सिंह सिरसा म्हणाले की, पन्नूने आधी स्वतःचा मान वाचवावा, भारतातील शीख समुदायाला अपकीर्त करण्याचा त्याचा प्रयत्न व्यर्थ आहे.

संपादकीय भूमिका

  • पंजाबमधील प्रत्येक देशभक्त शिखाने यास उघडपणे विरोध केला पाहिजे !
  • पन्नू अमेरिकेचा नागरिक आहे; मात्र भारताला इतक्या धमक्या देऊनही अमेरिका त्याच्यावर कारवाई करत नाही. यातून हे स्पष्ट होते की, त्याला अमेरिकेचीच फूस आहे !