Hindu Students Forced To Recite Namaz : ‘नॅशनल सर्व्हिस स्कीम’ (एन्.एस्.एस्.) शिबिरात हिंदु विद्यार्थ्यांना नमाजपठण करण्यास भाग पाडणार्‍या ७ शिक्षकांविरुद्ध गुन्हा नोंद

बिलासपूर (छत्तीसगड) येथील घटना

बिलासपूर (छत्तीसगड) – येथील ‘नॅशनल सर्व्हिस स्कीम’ (एन्.एस्.एस्.) शिबिराच्या वेळी ‘गुरु घासीदास सेंट्रल युनिव्हर्सिटी’तील हिंदु विद्यार्थ्यांना नमाजपठण करण्यास भाग पाडल्यावरून ७ शिक्षकांसह ८ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. कोटा पोलीस ठाण्याच्या सीमेतील शिवतराई गावात २६ मार्च ते १ एप्रिल या कालावधीत झालेल्या या शिबिरात १५९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. १५९ विद्यार्थ्यांपैकी केवळ ४ विद्यार्थी मुसलमान होते; मात्र विद्यापिठाने सर्व विद्यार्थ्यांना नमाजपठण करण्यास भाग पाडले. या प्रकरणी विद्यार्थ्यांनी निषेध व्यक्त करत तक्रार नोंदवली.

संपादकीय भूमिका

असे शिक्षक मुसलमान विद्यार्थ्यांकडून आरती, स्तोत्रपठण आणि नामजप करून घेण्याचे धाडस दाखवू शकतील का ? आणि हे विद्यार्थी ते कधीतरी म्हणतील का ?