DMK Ministers Resigned : सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तमिळनाडूचे मंत्री पोनमुडी आणि सेंथिल बालाजी यांचे त्यागपत्र

तमिळनाडूचे मंत्री व्ही. सेंथिल बालाजी आणि के. पोनमुडी

चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडूचे मंत्री व्ही. सेंथिल बालाजी आणि के. पोनमुडी यांनी मंत्रीपदाचे त्यागपत्र दिले आहे. राज्यपाल आर्.एन्. रवि यांनी दोघांचेही त्यागपत्र स्वीकारले आहेत. पोनमुडी यांनी शारीरिक संबंधांवरून शैव-वैष्णव टिळ्यावर अश्लील टिपणीने केल्याने वाद निर्माण केला होता.

नोकरीच्या पैशाच्या घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात मद्रास उच्च न्यायालयाने सेंथिल बालाजी यांचा जामीन संमत केला होता. यानंतर अवघ्या २ दिवसांनी मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी त्यांना पुन्हा मंत्री बनवले. यावर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती ए.जी. मसीह यांच्या खंडपिठाने सांगितले की, बालाजी यांनी मंत्रीपदाचा त्यागपत्र देण्याचे आश्वासन दिल्यामुळे त्यांना जामीन संमत करण्यात आला. जर बालाजी मंत्री राहिले, तर ते साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतात. त्यामुळे जर ते मंत्री राहिले, तर त्यांचा जामीन रहित केला जाईल.

संपादकीय भूमिका

घोटाळेबाज आणि अश्लील विधाने करणार्‍यांना मंत्रीपदावरून हटवण्यासाठी सर्वाेच्च न्यायालयाला आदेश द्यावे लागतात, हे ‘आम्ही राज्यघटनेचे रक्षण करतो’, असे म्हणणार्‍या पक्षांना लज्जास्पद !