रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

गोवा येथील सनातनचा रामनाथी आश्रम

१. श्री. विजय कुंभार, कोल्हापूर 

अ. ‘आश्रम पाहून मला अतिशय आनंद झाला.

आ. धर्मरक्षण आणि धर्मप्रसार यांच्या संदर्भात आपल्या आश्रमातून होत असलेले कार्य खरोखरंच कौतुकास्पद आहे. या आश्रमातून मला धर्मप्रसारासाठी प्रेरणा मिळाली.

 इ. हिंदु सनातन संस्कृती आणि हिंदु समाजाचे धर्माचरण यांविषयी अतिशय सखोल माहिती मिळाली.’

२. श्री. बाळासाहेब कोळेकर, कोल्हापूर 

अ. ‘आश्रम परिसर पुष्कळ सुंदर आहे. सर्वत्र स्वच्छता आणि टापटीप आहे.

आ. आश्रमात हिंदु धर्माविषयी पुष्कळ चांगली माहिती मिळाली. अध्यात्म आणि हिंदु धर्मातील अनेक संदर्भ साधकांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने समजावून सांगितले.

इ. येथे अतिशय सुंदर व्यवस्था आहे. सनातन संस्थेच्या ‘हिंदु धर्मरक्षण आणि धर्मप्रचार’ या कार्याला मनःपूर्वक शुभेच्छा !’

(सर्व सूत्रांचा दिनांक ७.१.२०२५)