साधकाला पहाटे सुचलेल्या ओळी आणि त्यांचा अर्थ ! 

‘३.१.२०२५ या दिवशी पहाटे ४ वाजता मला अकस्मात् झोपेतून जाग आली. त्या वेळी मला सुचलेल्या ओळी पुढे दिल्या आहेत.

श्री. राम होनप

मिळाला गुरुचरणी निवारा ।
जन्म-मृत्यूचा खेळ संपला ।।

अर्थ : जेव्हा साधकाला गुरुचरणांशी निवारा किंवा आश्रय मिळतो, म्हणजे त्याच्यावर गुरूंची कृपा होते, तेव्हा तो साधक जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होतो.

वरील ओळींचा अर्थ समजल्यावर माझा भाव जागृत झाला.’

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.१.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक