श्रीलंकेचा कसोटी सामन्यातील पाकविरोधातील विजय जादूटोण्यामुळे !

श्रीलंका क्रिकेट संघाचा कर्णधार दिनेश चंदिमल याचा दावा

कोलंबो –  पाकविरोधातील कसोटी सामन्यांमधील विजय जादूटोण्यामुळे मिळाला आहे. संयुक्त अरब अमिरातीमधील जादूटोणा करणार्‍याकडून यासाठी विशेष आशीर्वाद घेतला होता. तुमच्यामध्ये प्रतिभा असू शकते; मात्र अशा प्रकारच्या आशीर्वादाविना तुम्ही पुढे जाऊ शकत नाही, असे विधान श्रीलंकेच्या क्रिकेट संघाचा कर्णधार दिनेश चंदिमल याने पत्रकारांशी बोलतांना केले आहे. श्रीलंकेच्या क्रिकेट संघाने पाकच्या संघाचा कसोटीमध्ये २-०, असा पराभव केला. कसोटीतील विजयामागील रहस्य उघड करतांना कर्णधार दिनेश चंदिमल याने वरील विधान केले. यामुळे त्याच्यावर टीका होऊ लागली आहे. या स्पर्धेच्या पूर्वी श्रीलंकेच्या क्रीडामंत्र्यांनी जादूटोणा करण्यास अनुमती दिली नव्हती, असेही समोर आले आहे. चंदिमल याच्यासाठी त्यांच्या मित्राच्या आईने जादूटोणा केला होता, असे एनडीटीव्हीच्या वृत्तात म्हटले आहे.

पाकने नंतर एकदिवसीय सामन्यात ५-० आणि २०-२० षटकांच्या सामन्यात ३-० असा श्रीलंकेचा पराभव केला होता.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now