‘चैत्र कृष्ण त्रयोदशी (२६.४.२०२५) या दिवशी सनातनच्या ११८ व्या (समष्टी) संत पू. रत्नमाला दळवी यांचा ४८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधिकेने त्यांच्या चरणी अर्पण केलेले काव्यपुष्प येथे दिले आहे.
पू. रत्नमाला दळवी यांच्या चरणी त्यांच्या ४८ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

सनातनला मिळाले एक अनमोल रत्न (टीप)।
‘गुरुसेवा हीच गुरुपूजा’ असे त्यांचे प्रयत्न ।। १ ।।

त्यांना असे गुरुसेवेची तीव्र तळमळ ।
तत्त्वनिष्ठ, तरीही तेवढ्याच प्रेमळ ।। २ ।।
नियोजनकौशल्य वापरून घेतात देवाचे साहाय्य ।
साधक त्यांच्या सहवासात सदैव असतात शिकत ।। ३ ।।
शांतपणे करून देतात त्या साधकांना चुकांची जाणीव ।
सखोल चिंतनाने सापडते साधकांना स्वतःतील उणीव ।। ४ ।।
शांतपणे समजून घेतात त्या साधकांच्या अडचणी ।
‘चूक नेमकी कुठे आहे’, याची करतात पडताळणी ।। ५ ।।
सूत्र मार्गी लागेपर्यंत करतात त्या पाठपुरावा ।
परिपूर्ण सेवेचा त्यांचा ध्यास शिकावा ।। ६ ।।
फलनिष्पत्तीतील अडथळे शोधून काढतात ।
भावपूर्ण अन् परिपूर्ण सेवेचा मार्ग सुकर करतात ।। ७ ।।
अधिकोषच जणू अनेक गुणांचा ।
आधारस्तंभ आहेत साधकांचा ।। ८ ।।
गुणवर्णन करण्या नसे आमची पात्रता ।
काव्यपुष्प अर्पून चरणी व्यक्त करतो कृतज्ञता ।। ९ ।।
(टीप : पू. रत्नमाला दळवी)
– सौ. प्रज्ञा पुष्कराज जोशी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (७.४.२०२५)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |