पू. (सौ.) मनीषा पाठक यांनी सांगितलेल्या नामजपादी उपायांमुळे बाळाला झालेली कावीळ अल्प कालावधीत न्यून होणे

पू. (सौ.) मनीषा पाठक

‘माझी मुलगी सौ. स्नेहल अमित पारखी पुणे येथे रहाते. ती पुण्यामध्ये सनातन संस्थेच्या माध्यमातून ‘ऑनलाइन’ सत्संग घेण्याची सेवा करते. काही दिवसांपूर्वी तिने पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे बाळाला जन्म दिला. त्यानंतर बाळाला चार-पाच दिवसांमध्येच कावीळ झाली. तपासणीमध्ये बाळाला झालेल्या काविळीचे प्रमाण १९ पॉईंट होते. तेथील आधुनिक वैद्यांनी बाळावर उपचार केले; परंतु फारसा पालट होत नसल्याचे आमच्या लक्षात आले.

श्री. सुरेश सदाशिव पंडित

याविषयी मी पू. मनीषा ताईंना (सनातन संस्थेच्या १२३ व्या [समष्टी] संत पू. (सौ.) मनीषा पाठक, वय ४२ वर्षे यांना) कळवले. यावर पू. मनीषाताईंनी बाळाला होणारा शारीरिक त्रास उणावण्यासाठी आम्हाला एक नामजप करण्यास सांगितला. त्यानुसार मी प्रतिदिन दोन ते तीन घंटे तो नामजप भावपूर्णतेने केला. औषधोपचारांच्या समवेत या नामजपादी उपायांचा लाभ झाल्यामुळे चार दिवसांतच बाळाला झालेल्या काविळीचे प्रमाण ४ पॉईंटने न्यून झाले. तीन-चार दिवसांतच बाळामध्ये इतका सकारात्मक पालट झाल्यामुळे आधुनिक वैद्यांनीसुद्धा आश्चर्य व्यक्त केले. वरील अनुभूती दिल्याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहे.’

– श्री. सुरेश सदाशिव पंडित (वय ६६ वर्षे), सातारा. (१७.२.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक