२२ कोटी ३४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

ठाणे – मीरा-भाईंदर गुन्हे अन्वेषण शाखेने आंतरराष्ट्रीय कोकेन या अमली पदार्थाची तस्करी करणार्या टोळीवर कारवाई केली आहे. त्यांनी मीरारोड आणि वसई भागांतून तब्बल १५ किलो कोकेनसह परदेशी चलन असा २२ कोटी ३४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी २ परदेशी नागरिक आणि एका धर्मांध महिलेला अटक केली आहे. (कायद्याचे भय वाटत नसल्यामुळेच असे गुन्हे करण्याचे धाडस गुन्हेगार करत आहे. अशांवर कठोर कारवाई झाल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत ! – संपादक)