भटकळ (कर्नाटक) येथे घृणास्पद कृत्य : गाभण गाय कापून पोटातील वासराला नदीत फेकले !

भटकळ (कर्नाटक) – कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नड जिल्ह्यामधील भटकळ येथे एक घृणास्पद कृत्य घडल्याचे वृत्त आहे. येथे एका गाभण गायीची  निर्घृण हत्या करून तिच्या पोटातील वासराला नदीत फेकल्याचे उघडकीस आले आहे. अलीकडेच भटकळच्या शेजारी असलेल्या होन्नावर तालुक्यात गाभण गायीची हत्या करून गोमांस पळवल्याची घटना घडली होती.

(प्रतिकात्मक छायाचित्र)

भटकळ तालुक्यातील हेबळे येथील कुक नीरबाळी येथे गाभण गाय कापणार्‍या धर्मांधांनी तिच्या पोटातील वासरू आणि गायीची शेपटी वेंकटापुरा नदीत फेकून दिली. वासराला गोणपाटात गुंडाळून फेकण्यात आले होते. किनार्‍यावर भटकी कुत्री पोते ओढतांना स्थानिकांनी पाहिले. त्यांना त्यामध्ये मेलेले वासरू आढळून आले. त्याचबरोबर त्यांना तेथे गायीची शेपटीही सापडली. स्थानिकांनी तात्काळ ग्रामीण पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी माहिती गोळा करण्यास चालू केल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

कर्नाटकमध्ये काँग्रेसची हिंदुद्वेषी राजवट आल्यापासून दिवसेंदिवस हिंदु धर्मावरील आघातांमध्ये वाढ होत आहे. काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंना हे आघात मान्य आहेत का ?