खलिस्तानी आतंकवादी हॅपी पासिया याला अमेरिकेत अटक !

खलिस्तानी आतंकवादी हरप्रीत सिंह

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतील पोलिसांनी खलिस्तानी आतंकवादी हरप्रीत सिंह उपाख्य हॅपी पासिया याला अटक केली आहे. त्याच्या अटकेची छायाचित्रेही प्रसारित झाली आहेत. या समवेत म्हटले की, ‘आज भारतातील पंजाबमधील आतंकवादी आक्रमणांसाठी उत्तरदायी असलेल्या आतंकवादी हरप्रीत सिंह याला सॅक्रामेंटो येथे अटक केली.’


सौजन्य : सुदर्शन न्यूझ

१. हॅपी पासिया पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.च्या (इंटर सर्व्हिस इंटेलिजन्सच्या) जवळचा असल्याचे मानले जाते. त्याने बब्बर खालसा इंटरनॅशनल आणि आतंकवादी रिंडा यांच्यासमवेत पंजाबमध्ये अनेक ग्रेनेड आक्रमणे अन् आतंकवादी कारवाया केल्या आहेत.

२. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने जानेवारी २०२५ मध्ये हॅपी पासियावर ५ लाख रुपयांचे बक्षीस घोषित केले होत.