मौलवीकडून मुलांसमवेत दुष्कृत्य
भिवंडी – येथे एका मौलवीने मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह दुकानात पुरला. जवळपास साडेचार वर्षांनी ही घटना उघड झाली. गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या कारवाईत मौलवी गुलाम रब्बानी शेख याला अटक केली आहे. (धर्मांधांची क्रूर मानसिकता जाणा ! – संपादक) अल्पवयीन मुलांसोबत दुष्कृत्य करणार्या मौलवीवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे.
१. शोएब शेख भिवंडीत त्याच्या कुटुंबासोबत रहात होता. २० नोव्हेंबर २०२० या दिवशी तो अचानक बेपत्ता झाला. या प्रकरणी पोलिसात तक्रार प्रविष्ट करण्यात आली होती.
२. मौलवी गुलाम रब्बानी शेख हा नेहरूनगरमधील एका मशिदीत अजान देण्याचे काम करत होता, तसेच तो किराणा मालाचे दुकानही चालवत होता. याच दुकानात तो अल्पवयीन मुलांसोबत दुष्कृत्य करत असे. याविषयी दुकानात काम करणार्या शोएबला ठाऊक होते. याविषयी तो सांगेल, या भीतीने मौलवीने त्याला गप्प रहाण्यासाठी पैसे देत असे. नंतर शोएबने मौलवीकडून पैसे उकळायला प्रारंभ केला. त्याला कंटाळून मौलवी एक दिवस शोएबला दुकानात बोलावून त्याचा गळा दाबून त्याची हत्या केली. त्याचा मृतदेह दुकानातच गाडला.
३. मौलवीने ज्या अल्पवयीन मुलांवर अत्याचार केले होते, त्यांनीही पोलीस ठाण्यात तिची तक्रार केली होती. चौकशीच्या वेळी मौलवी पसार झाला. पोलिसांनी त्याच्याभिवंडी भ्रमणभाषसंचाचे लोकेशन पडताळून त्याला अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिका
|