बुलढाणा येथे केसगळती झालेल्यांची नखे गळून पडली !  

नखेगळती झालेल्या रुग्णांची संख्या २९

बुलढाणा – येथील शेगाव तालुक्यातील नागरिकांचे केसगळती प्रकरण मध्यंतरी उघडकीस आले होते. आता केसगळती झालेल्या रुग्णांची नखे गळून पडत आहेत. यामुळे गावकरी भयभीत झाले आहेत. काही नागरिकांची नखे विद्रूप होऊन कमकुवत झाली आहेत. सध्या ४ गावांमध्ये एकूण २९ अशा प्रकारचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.