शैवांचा पट्टाई (आडवा टिळा) आणि वैष्णवांचा नाम (सरळ उभा टिळा) यांची अश्लील लैंगिक स्थितीशी केली तुलना
(द्रमुक म्हणजे ‘द्रविड मुन्नेत्र कळघम्’, म्हणजे द्रविड प्रगती संघ)

चेन्नई (तमिळनाडू) – शैवांचा पट्टाई (आडवा टिळा) आणि वैष्णवांचा नाम (सरळ उभा टिळा) यांची अश्लील लैंगिक स्थितीशी तुलना कल्याच्या प्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाने तमिळनाडूचे उच्चशिक्षण मंत्री पोनमुडी यांना नोटीस बजावली आहे. तसेच २३ एप्रिल २०२५ पर्यंत पोनमुडी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याचा आदेश दिला आहे. मद्रास उच्च न्यायालयाने १७ एप्रिल २०२५ या दिवशी या प्रकरणी सुनावणीच्या वेळी म्हटले की, जर सरकार इतरांची द्वेषपूर्ण भाषणे गांभीर्याने घेत असेल, तर त्यांनी स्वतःच्या मंत्र्यांविरुद्धही असेच करावे. न्यायमूर्ती व्यंकटेश यांनी पोलिसांच्या निष्क्रियतेवर अप्रसन्नता व्यक्त केली आणि न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्यास कारवाई केली जाईल, अशी चेतावणी दिली.
या प्रकरणी अधिवक्ता बी. जगन्नाथन् यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. यामध्ये पोनमुडी यांच्यावर हिंदूंच्या श्रद्धांचा अपमान केल्याचा आरोप केला होता. पोनमुडी यांचा टिळ्यांविषयीच्या विधानाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाल्यावर राज्यभरातून त्यांच्यावर टीका करण्यात आली. या घटनेनंतर द्रमुकने पोनमुडी यांना पक्षाच्या उपसरचिटणीस पदावरून काढून टाकले; परंतु अद्याप त्यांना मंत्रीपदावरून काढून टाकलेले नाही.
संपादकीय भूमिका
|