बदायू (उत्तरप्रदेश) – येथील काकरालामध्ये घराचे मशिदीत रूपांतर केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी पोचले. माहिती गोळा केल्यानंतर या घराला टाळे ठोकण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला चौकशीसाठी कह्यात घेतले आहे. ही मशीद वॉर्ड क्रमांक ४ येथील रहिवासी डॉ. मुंतझीर यांनी बांधली आहे. पोलिसांनी सांगितले की, आतापर्यंत बांधकाम करणारे डॉ. मुंतझीर यांना कोणतीही वैध कागदपत्रे दाखवता आलेली नाहीत. या प्रकरणाची चौकशी चालू आहे.
डॉ. मुंतझीर यांनी सांगितले की, त्यांची आई नसीम बानो यांना त्यांच्या भूमीवर मशीद बांधायची होती. यामुळे मशिदीचे बांधकाम वर्ष २०२० मध्ये चालू झाले होते, ते फेब्रुवारी २०२५ मध्ये पूर्ण झाले. मशिदीचा फलक पाहून लोकांना याची माहिती मिळाली. मशिदीचे बांधकाम नसीम बानो यांच्या उपस्थितीत चालू करण्यात आले होते; मात्र त्यानंतर त्यांचे निधन झाले.