चित्र औरंगजेबाचे नाही, तर बहादुर शाह जफर यांचे असल्याचा रेल्वेचा दावा

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – गाझियाबाद रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ४ वर असणार्या औरंगजेबाच्या चित्रावर ‘हिंदु रक्षा दल’ नावाच्या हिंदु संघटनेने काळे फासले. ‘सरकारी इमारतीवर मोगल आक्रमकाचे चित्र पुसण्यासाठी रेल्वे अधिकार्यांना एक निवेदनही सादर केले जाईल’, असे या हिंदु संघटनेच्या अधिकार्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात गाझियाबाद रेल्वे अधिकार्यांनी दावा केला आहे की, हे चित्र औरंगजेबाचे नाही, तर शेवटचा मोगल बादशाह आणि वर्ष १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेला बहादूर शाह जफर याचे आहे.
🚨 #GhaziabadRailwayStation : Hindu group blackens portrait at Ghaziabad station, claiming it was Aurangzeb!
🚆 Railways clarify: “It’s not Aurangzeb, but Bahadur Shah Zafar.”
🤔 If it was Bahadur Shah Zafar, then why wasn’t his name mentioned below the portrait? The question… pic.twitter.com/pPP4rBXnSw
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 18, 2025
हिंदु रक्षा दलाशी संबंधित लोक मोठ्या संख्येने गाझियाबाद रेल्वे स्थानकावर पोचले होते. त्यांनी घोषणाबाजी करत या चित्रावर काळे फासले. या संघटनेचे म्हणणे आहे की, रेल्वे ही सरकारी मालमत्ता आहे. तेथे अशा प्रकारची चित्रकला सहन केली जाणार नाही. रेल्वे अधिकार्यांना ते चित्र स्वतःहून पुसण्यास सांगितले आहे. औरंगजेब हा मुसलमान आक्रमक होता.
संपादकीय भूमिकाजर हे चित्र औरंगजेबाचे नाही, तर बाहदूर शाह जफर यांचे होते, तर रेल्वे प्रशासनाने चित्राच्या खाली त्याचे नाव का लिहिले नाही ? असा प्रश्न उपस्थित होतो ! |