तुळशी विवाहातील पूजन, सामुग्री, कार्यरत देवतातत्त्व, कार्यरत त्रिगुण आणि उपयुक्तता

१ नोव्हेंबर २०१७ पासून चालू होत असलेल्या तुळशीविवाहारंभाच्या निमित्ताने…

श्री. राम होनप
कु. मधुरा भोसले

 

१. तिथी

हा विधी कार्तिक शुक्ल पक्ष द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत (या वर्षी १ ते ४ नोव्हेंबर या कालावधीत) एखाद्या दिवशी करतात.

आध्यात्मिक महत्त्व : ‘या कालावधीत श्रीविष्णूची शक्ती आणि चैतन्य सूक्ष्मतर स्तरावर ब्रह्मांडात कार्यरत असतात. त्यामुळे या कालावधीत तुळशी विवाह केला जातो.

२. पूजन

श्रीविष्णूचा (बाळकृष्णाच्या मूर्तीचा) तुळशीशी विवाह लावून देणे, हा तुळशी विवाहाचा विधी आहे. पूर्वीच्या काळी बालविवाहाची पद्धत होती. विवाहाच्या पूर्वदिवशी तुळशीवृंदावन रंगवून सुशोभित करतात. वृंदावनात ऊस, झेंडूची फुले घालतात आणि मुळाशी चिंचा अन् आवळे ठेवतात. हा विवाहसोहळा सायंकाळी करतात.

आध्यात्मिक महत्त्व : वातावरणात कार्यरत असणारे श्रीविष्णूचे तत्त्व बाळकृष्णाच्या प्रतिमेत कार्यरत होते आणि श्रीविष्णूची शक्ती तुळशीमध्ये कार्यरत होते. श्रीविष्णूचे चैतन्यदायी तत्त्व आणि त्याची तुळसरूपी शक्ती यांचे सूक्ष्मातून मिलन होते. ‘तुळशीचा श्रीकृष्णाशी विवाह’, हे सूक्ष्मातील या मीलनाचे सगुणातील प्रतीक आहे.

तुळशीच्या वृंदावनाच्या पूजेसाठी वापरलेल्या विविध वस्तूंमध्ये विविध तत्त्वे कार्यरत असतात. प्रसादाच्या रूपाने साखरही वाटली जाते.

२ अ. तुळशी विवाहातील सामुग्री, कार्यरत पहिली विचारसरणी : कु. मधुरा भोसले, (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.१०.२०१७ रात्री ११)

दुसरी विचारसरणी : श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.१०.२०१७)

३. वैशिष्ट्ये

तुळशी विवाह झाल्यानंतर चातुर्मासात जी व्रते घेतलेली असतील, त्या सर्वांची सांगता करतात. चातुर्मासात जे पदार्थ वर्ज्य केले असतील, ते पदार्थ ब्राह्मणाला दान देऊन मग स्वतः सेवन करतात.

आध्यात्मिक महत्त्व : श्रावण, भाद्रपद, आश्‍विन आणि कार्तिक हे चातुर्मासातील ४ मास आहेत. या चार मासात (महिन्यात) चातुर्मासातील कर्मकांडांचे पालन करायचे असते. तुळशीचा विवाह झाल्यावर सगुणातून पूर्ण करायच्या कर्मकांडात्मक कृतींचा कालावधी पूर्ण होतो. त्यामुळे चातुर्मासात पाळायचे यम-नियम संपून चातुर्मासात वर्जित केलेले पदार्थ ब्राह्मणाला दान केले जातात. अशाप्रकारे वर्जित पदार्थ धर्मरूपी ब्राह्मणत्वात विलीन होतात आणि उपासकाला या पदार्थांचे सेवन करण्याची अनुमती धर्मदेवतेकडून मिळते.’

– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.१०.२०१७ रात्री ११)

संदर्भ : सणाविषयीची तात्त्विक माहितीचा सनातनचा ग्रंथ, ‘सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र’ भाग १, खंड १ यातील असून सणाचे ‘आध्यात्मिक विश्‍लेषण’ कु. मधुरा भोसले यांना सूक्ष्मातून मिळालेल्या ज्ञानातील आहे.

देवतातत्त्व, कार्यरत त्रिगुण आणि उपयुक्तता

वाचकांना निवेदन
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. 

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now