(‘कट्टून’ ही दक्षिण कन्नड जिल्ह्यातील एक लोकपरंपरा आहे, ज्यामध्ये पुरुष विविध वेशभूषा करतात.)

बेळ्तंगडी (दक्षिण कन्नड) – कर्नाटकाच्या बेळ्तंगडी तालुक्यातील पेराडी गावात पुरुषांच्या ‘कट्टून’ नावाच्या लोकोत्सवात मुस्लिम वेश परिधान करून इस्लाम पंथ, महंमद पैगंबर आणि पवित्र अजान यांचा अपमान केल्याचा आरोप धर्मांध मुसलमानांनी केला आहे. १४ एप्रिलला रात्री ११ ते १२ वाजण्याच्या दरम्यान पुरुषांच्या ‘कट्टून’ लोकपरंपरेत इस्लामची वेशभूषा करून कथित थट्टा केल्याचा आरोप आहे. हिंदु आणि मुसलमान यांच्यात शत्रुत्वाची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने हा प्रकार सामाजिक माध्यमांत प्रसारित करण्यात आला, असाही आरोप करत पडंगडी गावातील रहिवासी महंमद रफीक यांनी पोलिसांत प्रविष्ट (दाखल) केलेल्या तक्रारीत केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी १७ हिंदूंच्या विरोधात वेणुरू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकाहिंदु देवतांचा अवमान करणार्या धर्मांधांवर अशा प्रकारे पोलीस गुन्हा नोंदवतात का ? |