
१. शरिराने सेवा झाली नाही, तरी मनात साधनेचे विचार येत असल्यास ईश्वराचे साहाय्य मिळणे
श्री. श्रीकांत चौधरी : ‘माझे साधनेचे काहीच प्रयत्न नाहीत, तरीही ‘देव माझ्यावर इतकी कृपा का करतो ?’, असा मला प्रश्न पडतो.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : तुमच्याकडून प्रत्यक्षात साधनेची कृती फार होत नसली, तरी मनात साधनेविषयी काही विचार येतच असतील ना ? ‘मला साधना करून प्रगती करायची आहे. मला साधनेत पुढे जायचे आहे’, हा विचार असतो कि नाही ?
श्री. श्रीकांत चौधरी : हो.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : त्यासाठीच ईश्वर तुम्हाला साहाय्य करतो. ‘मला साधना करून प्रगती करायची आहे’, असे विचार मनात नसतील आणि बाह्यतः शरिराने कितीही सेवा केली, तरी त्याचा फारसा लाभ होत नाही.’
– श्री. श्रीकांत चौधरी, बेंगळुरू (१६.२.२०२४)