

श्री. मधुसूदन कुलकर्णी (वय ६२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) : ‘प.पू. डॉक्टर, काही वेळा माझे मन आणि बुद्धी यांवर अनिष्ट शक्ती आक्रमण करते; पण आपले स्मरण केल्यावर त्याची तीव्रता न्यून होते. कधी कधी माझ्या मनात विचारांचा पुष्कळ संघर्ष चालू असतो. काही वेळा माझ्या मनात नकारात्मक विचारही येतात. तेव्हा पुष्कळ संघर्ष करूनच त्यावर मात करावी लागते; परंतु पुनः दुसरे विचार मनात येतच रहातात. यासाठी मी स्वयंसूचना घेतो.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : जेव्हा तुमची साधना अजून वाढेल आणि तुमची आध्यात्मिक पातळी वाढेल, तेव्हा तुम्हाला मनच रहाणार नाही. त्यामुळे मनात विचारही येणार नाहीत. जोपर्यंत मन आहे, तोपर्यंत विचार येतच रहाणार ! आपण पृथ्वीवर आहोत. येथे मनात विचार येणारच. आपली साधना स्थूल देहाच्या पुढच्या टप्प्याची आहे. मनोलय झाल्यावर साधना करण्याची वेगळी आवश्यकता लागत नाही. आपले कार्य समष्टी कार्य आहे. ते आपण करत रहायचे.’