केरळमधील आणखी एक हिंदु मुलगी लव्ह जिहादची बळी

• इस्लाममध्ये धर्मांतर करून तिला आतंकवादी कारवायांसाठी अफगणिस्तानात पाठवल्याचा आईचा आरोप

• घटनेची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या वतीने चौकशी करण्यासाठी आईची सर्वोच्च न्यायालयात धाव

डाव्यांच्या राज्यात हिंदू असुरक्षित ! कुठलेही सरकार हिंदु मुलींचे लव्ह जिहादपासून रक्षण करू शकत नाही, हे एका मागोमाग एक घडणार्‍या अशा घटनांवरून स्पष्ट होते ! यास्तव हिंदु राष्ट्रच हवे !

नवी देहली – केरळमधील आणखी एका हिंदु मुलीचे इस्लाममध्ये धर्मांतर करून तिला आतंकवादी कारवायांसाठी अफगाणिस्तानात पाठवले असल्याची माहिती पीडित मुलीच्या आईनी दिली. ‘हे लव्ह जिहादचे प्रकरण असून त्याची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेमार्फत चौकशी करावी’, अशी मागणी करणारी याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट केली. बिंदू संपत असे पीडित मुलीच्या आईचे नाव असून त्यांनी अधिवक्ता ऐश्‍वर्य भाटी यांच्यामार्फत ही याचिका प्रविष्ट केली आहे. यापूर्वी हादिया नावाच्या मुलीच्या बाबतीत घडलेल्या लव्ह जिहादच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे.

बिंदू संपत म्हणाल्या, ‘‘माझी मुलगी महाविद्यालयात शिकत असतांना तिला इस्लामी कट्टरवाद्यांनी लव्ह जिहादच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर तिचे इस्लाममध्ये धर्मांतर केले. त्यातून तिचा शारीरिक छळ केला गेला. तिला गर्भपातासाठी बळजोरी करण्यात आली. यानंतर सज्जाद रहमान नावाच्या इसमाने तिला सोडून दिले. जेव्हा ती दयनीय अवस्थेत होती, तेव्हा इसा उपाख्य बॅक्सन नावाच्या मुलीने तिला विवाह करण्यास उद्युक्त केले.

इसा स्वत: मूळची ख्रिस्ती असून धर्मांतर करून ती इस्लामी बनली आहे. माझ्या मुलीला अफगाणिस्तानात जिहादमध्ये सहभागी होण्यासाठी फितवले गेले असून सध्या ती अफगाणिस्तानातील खोरासन प्रांतातील इसिसच्या छावणीत असण्याची शक्यता आहे.’’

याविषयी श्रीमती बिंदू संपत यांचे अधिवक्ता ऐश्‍वर्य भाटी म्हणाले, ‘‘याचिकाकर्ता एका सर्वसाधारण देशभक्त कुटुंबातील आहेत. त्यांना २ मुले आहेत. मुलगा सैन्यात अधिकारी आहे. त्यांची मुलगी दंतचिकित्सा महाविद्यालयात शिकत असतांना ती कट्टरपंथीय इस्लामी लोकांच्या षड्यंत्राची बळी ठरली.’’ या याचिकेत ‘लव्ह जिहादमुळे अनेक तरुणी आणि अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत’, असेही नमूद करण्यात आले आहे.

केरळमधील लव्ह जिहादच्या अन्य एका प्रकरणातील हिंदु तरुणीशी सर्वोच्च न्यायालय चर्चा करणार

नवी देहली – केरळमधील ‘लव्ह जिहाद’च्या अन्य एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अखिला हिच्या वडिलांना २७ नोव्हेंबरला होणार्‍या सुनावणीच्या वेळी तिला न्यायालयात उपस्थित करण्याचा आदेश दिला आहे. न्यायालय या मुलीशी चर्चा करून तिची मानसिक स्थिती जाणून घेणार आहे. यापूर्वी केरळ उच्च न्यायालयाने तिचा विवाह रहित करून तिला वडिलांकडे सोपवण्याचा आदेश दिला होता.

१. सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीच्या वेळी म्हटले की, मुलगी सज्ञान आहे आणि तिची इच्छा जाणून घेणे महत्त्वाची आहे. ती सज्ञान असल्याने ती कोणासमवेतही जाण्यास स्वतंत्र आहे. या प्रकरणाची चौकशी करणार्‍या राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने न्यायालयाला या वेळी सांगितले की, अशा प्रकारच्या एकूण ८९ प्रकरणांतील कार्यपद्धत साधारण एकसारखी आहे.

२. एन्आयएकडून अतिरिक्त महाधिवक्ता मनिंदर सिंह यांनी न्यायालयाला सांगितले की, एन्आयएच्या चौकशीत लक्षात आले आहे की, तरुणांना लक्ष्य करून त्यांना जिहादसाठी सिद्ध करण्यासाठी एक व्यवस्थित यंत्रणा कार्यरत आहे. एखादी व्यक्ती अचानक स्वतःचा धर्म, आईवडील यांचा द्वेष करू लागली, तर ‘ती तिच्या इच्छेने असे वागत आहे’, असे म्हणता येणार नाही. तिचे ‘ब्रेनवॉश’ करण्यात आले आहे’, असेच म्हणावे लागेल.

३. यावर न्यायालयाने म्हटले की, आम्ही अखिलाशी न्यायालयातच संवाद साधू आणि तिच्या मानसिकतेचे आकलन करू. जर असे लक्षात आले की, अखिला हिचा ‘ब्रेनवॉश’ करण्यात आले आहे, तर चौकशीचा आदेश देऊ.

४. अखिला हिने धर्मांतर करून शैफीन नावाच्या मुसलमान तरुणाशी विवाह केला होता. यावर तिचे वडील अशोकन् यांनी मुलीचा विवाह रहित करण्याची मागणी केरळ उच्च न्यायालयामध्ये केली होती. ‘तिचे बळजोरीने धर्मांतर करण्यात आले आहे आणि शैफीन याचे आतंकवादी संघटना इसिसशी संबंध आहे’, असे त्यांनी या याचिकेत म्हटले होते. यावर न्यायालयाने हा विवाह रहित करून अखिला हिला आईवडिलांकडे सोपवण्याचा आदेश दिला होता. त्यावर शैफीन याने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.


Multi Language |Offline reading | PDF