काश्मीरवरील देशद्रोही वक्तव्यावरून चिदंबरम् यांना काँग्रेसकडून कानपिचक्या !

नवी देहली – काश्मीरला अधिक स्वायत्तता देण्याची मागणी करणारे काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम् यांना काँग्रेसने कानपिचक्या देत काश्मीरविषयी विधाने करण्यास मज्जाव केला आहे. काँग्रेस पक्षाचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला म्हणाले, ‘‘जम्मू, काश्मीर आणि लडाख हे भारताचे अविभाज्य अंग आहेत आणि कायम रहातील. कोणाचे वैयक्तिक विचार हे काँग्रेस पक्षाचे विचार असू शकत नाहीत. लोकशाहीत प्रत्येकाला त्याचे विचार मांडण्याचा अधिकार आहे.’’ (काँग्रेस पक्षाचे आणि त्याच्या नेत्याचे मत वेगवेगळे कसे ? चिंदबरम् यांच्या मताला वैयक्तिक मत असल्याचे सांगून काँग्रेस पक्ष स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे का ? – संपादक) काँग्रेसच्या या भूमिकेमुळे चिदंबरम् पक्षात एकाकी पडले आहेत.


Multi Language |Offline reading | PDF