काश्मीरमधील आतंकवादासाठी सौदी अरेबियातून अर्थपुरवठा

काश्मीरमध्ये अशाप्रकारे विदेशातून आतंकवादासाठी अर्थपुरवठा होत असतांनाही त्याविषयी गुप्तचर विभाग आणि अन्वेषण यंत्रणा यांना याविषयी कोणतीही माहिती कशी मिळत नाही ? कि आर्थिक लाभासाठी अशा कृत्यांकडे दुर्लक्ष केले जाते ? अशा यंत्रणांपासून देशाचे रक्षण कसे होणार ?

नवी देहली – काश्मीरमधील आतंकवादासाठी सौदी अरेबियातून अर्थपुरवठा केला जात आहे, असे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (एन्आयएच्या) चौकशीतून समोर आले आहे.

पाकमध्ये रहाणारा आतंकवादी सय्यद सलाउद्दीन याचा मुलगा शाहीद युसूफ याला नुकतीच अटक करण्यात आली आहे. त्याच्या चौकशीतून ही माहिती मिळाली आहे. शाहीदने सांगितले की, सौदीमध्ये रहाणारा हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख एजाज अहमद भट यांच्याकडून पैसे पाठवले जातात. एन्आयएने यापूर्वीच इंटरपोलच्या माध्यमातून त्याच्या विरोधात रेडकॉर्नर नोटीस पाठवलेली आहे. आता सौदी अरेबियाच्या सुरक्षायंत्रणेशी या संदर्भात संपर्क करण्यात येणार आहे.

एजाज हा पाकची गुप्तचर संस्था आयएस्आयच्या सांगण्यावरून हिजबुल मुजाहिदीनच्या आतंकवाद्यांना पैसे पाठवत होता. यासाठी तो शाहीद युसूफच्या अधिकोष  खात्यामध्ये पैसे जमा करत होता. एजाज याने शाहीदच्या खात्यामध्ये ८ हून अधिक वेळा पैसे जमा केलेले आहेत. शाहीदने याची स्वीकृतीही दिली आहे. या प्रकरणी सलाउद्दीन याच्या मुलीच्या मुलीलाही (नातीला) चौकशीसाठी एन्आयएच्या कार्यालयात उपस्थित रहाण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. एन्आयएने यापूर्वी या प्रकरणी ६ जणांवर दोन आरोपपत्रे प्रविष्ट केली आहेत. यात काही फुटीरतावादी नेत्यांचा समावेश आहे.


Multi Language |Offline reading | PDF