परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे कु. अपाला औंधकर हिच्यासारखी आध्यात्मिक मैत्रीण मिळणे

कु. अपाला औंधकर

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सुवचन आहे, ‘स्थूल देहा असे स्थळकाळाची मर्यादा । कैसे असू सर्वदा सर्वा ठायी ।।  सनातन धर्म माझे नित्य रूप । त्या रूपे सर्वत्र आहे सदा ।।’ प.पू. गुरुदेव वयामुळे सगळीकडे स्थुलातून जाऊ शकत नाहीत; मात्र सद्गुरु, संत आणि सर्व साधक यांच्या रूपांत ते सतत आपल्या समवेत असतात.

कु. शर्वरी कानस्कर

गुरुदेवांनी मला कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १८ वर्षे) हिच्यासारखी आध्यात्मिक मैत्रीण दिली. तिच्या मनात श्रीमन्नारायणाप्रती (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती) पुष्कळ भाव आहे. माझ्यात काही स्वभावदोष आहेत आणि अपालामध्ये त्याच्या विरुद्ध गुण आहेत, उदा. मी नेतृत्व घेऊन सेवा करायला न्यून पडते, तर अपाला नेतृत्व घेऊन पुष्कळ चांगली सेवा करते. माझ्यातील ‘स्वभावदोषांचे गुणांमध्ये रूपांतर होण्यासाठी परात्पर गुरुदेव मला अपालाच्या माध्यमातून पुष्कळ साहाय्य करतात.’

–  कु. शर्वरी कानस्कर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १८ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.