मानवी जीवन ही भगवंताने मानवाला दिलेली मूल्यवान देणगी असल्याने सात्त्विक गुण प्रत्यक्षात उतरवणार्‍यांच्या जीवनात दिवाळी होईल !

‘सात्त्विक गुण जे जीवनात आणतील, त्यांच्या जीवनात दिवाळी होईल आणि जे हे गुण प्रत्यक्षात उतरवणार नाहीत, त्यांच्या जीवनाची होळी होईल. त्यांचे आयुष्य वाया गेल्यासारखे होईल.

मानवी जीवन ही या जगातील एक अत्यंत अमौलिक वस्तू आहे. भगवंताने मानवाला दिलेली मूल्यवान देणगी आहे. हे गुण जीवनात आणणाराच भगवंताच्या दृष्टीने सभ्य माणूस आहे. त्यालाच भगवंत आपल्या जवळ बोलावतो.

‘आपले जीवन कृतार्थ व्हावे, जीवनपुष्प सुगंधी बनावे आणि ते शेवटी भगवंताच्या चरणांवर अर्पण करावे’, या भावनेने प्रेरित होऊन आदर्श जीवनाची वाटचाल करायला प्रारंभ करण्याची शक्ती योगेश्वराने सर्वांना द्यावी’, हीच प्रार्थना !’

(साभार : ग्रंथ – ‘भारतियांचे सांस्कृतिक आदर्श जीवन’ – प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांची प्रवचने)