
मलकापूर (जिल्हा कोल्हापूर) – मार्च २०२५ मध्ये एम्.बी.बी.एस्.च्या अंतिम परीक्षेमध्ये येथील कु. तन्वी संजय गांधी (वय २५ वर्षे) उत्तीर्ण झाल्या. त्या आंबेजोगाई येथील ‘श्री रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालया’त शिकत होत्या. ‘एम्.बी.बी.एस्.’ ही पदवी प्राप्त करणार्या मलकापूर गावच्या त्या पहिल्या कन्या आहेत. सनातन संस्थेचे साधक वैद्य संजय श्रीकृष्ण गांधी यांच्या त्या कन्या आहेत. कु. तन्वी यांनी त्यांच्या यशाचे श्रेय तिची आई वैद्य (सौ.) अमिता गांधी, बहीण, शिक्षक यांना दिले आहे. ‘भगवान श्रीकृष्णाच्या कृपेमुळे हे यश संपादन करू शकले’, असे कु. तन्वी यांनी सांगितले.