कर्मचारी भरती आयोगाच्या परीक्षेत मराठीला स्थान द्या !

सत्तरी तालुक्यातील मराठीप्रेमींचे राजभाषा संचालनालयाला निवेदन

 

राजभाषा संचालकांना निवेदन देतांना  अधिवक्ता शिवाजी देसाई आणि इतर भाषाप्रेमी

वाळपई, ११ मार्च (वार्ता.) – कर्मचारी भरती आयोगाच्या परीक्षेत मराठीला स्थान द्यावे. सरकारी कार्यालयात मराठीतून फलक लावावे, या मागण्यांना अनुसरून सत्तरी तालुक्यातील मराठीप्रेमींनी ११ मार्च या दिवशी राजभाषा संचालनालयाच्या संचालकांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन सादर केले. या वेळी अधिवक्ता शिवाजी देसाई, डॉ. अनुजा जोशी, चंद्रकांत गावस, माधव सटवानी, प्रकाश भगत, संदीप केळकर, विजय नाईक, दशरथ मांद्रेकर, सौ. रोशन देसाई, गणपतराव राणे, विश्वेश परोब, तुळशीदास काणेकर, प्रभाकर ढगे, बाबली कांदोळकर यांची उपस्थिती होती.