बेंगळुरूतील मदरशामध्ये मुलीवर आक्रमण झाल्याच्या घटनेचे प्रकरण

बेंगळुरू (कर्नाटक) – हसन नावाच्या एका मुसलमानाने काही दिवसांपूर्वी येथील मदरशामध्ये एका मुलीवर आक्रमण केले होते. या घटनेचा व्हिडिओ ‘सी.सी.टी.व्ही.’द्वारे समोर आला होता. या प्रकरणी पीडितेच्या पालकांनी पोलिसांत तक्रार केली. यावर मदरशामधील लोकांनी दूरभाषवरून पालकांना ‘आक्रमणाच्या प्रकरणातील तक्रार मागे घ्यावी, अन्यथा जिवे मारू’, अशी धमकी दिली’, असा आरोप पालकांनी केला आहे.
यासंदर्भात पीडित मुलीच्या आईने यशवंतपूर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. तक्रारीनुसार यशवंतपूर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
संपादकीय भूमिकाकायदा-सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले काँग्रेसशासित कर्नाटक राज्य ! |