संभल (उत्तरप्रदेश) जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कृष्ण कुमार बिश्नोई यांचे विधान !
संभल (उत्तरप्रदेश) – होळीचा सण वर्षातून एकदा येतो. शुक्रवारचे दुपारचे नमाजपठण हा काही विशेष सण नाही. उलट तो एका विशेष समाजाचा मेळावा असतो, असे विधान संभलचे पोलीस अधीक्षक कृष्ण कुमार बिश्नोई यांनी केले आहे. १४ मार्चला शुक्रवार आहे आणि होळीचा सण संपल्यानंतर दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी नमाजपठण केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यापूर्वी मुख्य पोलीस अधिकारी अनुज चौधरी म्हणाले होते की, शुक्रवार वर्षातून ५२ वेळा येतो, होळी आणि ईद सण एकदाच येतात. होळीच्या रंगामुळे धर्म भ्रष्ट झाला किंवा इतर कोणतीही समस्या उद्भवू नये, म्हणून त्या लोकांनी घरी राहून नमाजपठण करावे.
संपादकीय भूमिकाया विधानावरून बिश्नोई यांच्यावर टीका केली जाऊ शकते; मात्र होळी हा राष्ट्रीय सण असल्याने त्याच्या समोर कोणत्याही धर्मातील एखादी धार्मिक कृती मर्यादित महत्त्वाचीच ठरते, ही सुस्पष्टता प्रत्येक हिंदूने बाळगणे आवश्यक ! |