
पणजी, ९ मार्च (वार्ता.) – कसयले, उसगाव येथील ५ वर्षीय बालिकेची हत्या काळ्या जादूमुळे नव्हे, तर मुलीची आई आणि आरोपी पूजा यांच्यामधील भांडणापोटी झाल्याची माहिती पोलिसांनी अन्वेषणानंतर दिली आहे; मात्र या प्रकरणी हत्या काळ्या जादूमुळे झालेली नसली, तरी हा विषय सध्या गोव्यात चर्चेचा विषय झालेला आहे. याविषयी ‘ऑनलाईन’ माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केल्यास गोव्यात काळी जादू आणि वशीकरण सेवा देणारी अनेक संकेतस्थळे उपलब्ध असल्याचे दिसत आहे.
यामधील अनेक संकेतस्थळे प्रेम प्रकरणे, लग्न आणि चांगला व्यवसाय करणे किंवा नोकरी मिळवणे (करियर) यासंबंधी मार्गदर्शन करत असल्याचा दावा करत आहेत, तर यामधील एक संकेतस्थळ ‘काळ्या जादूमुळे शत्रूला मागे पुरावा न ठेवता ठार करू शकतो’, असा दावा करण्यात आला आहे. यामधील काही संकेतस्थळांनी गोव्यात काळ्या जादूचा सर्रासपणे वापर केला जात असल्याचा दावा केला आहे. ‘वन एस्ट्रॉलॉजर मॅजिक स्पेशालिस्ट’, ‘पंडित ब्लॅक मॅजिक स्पेल्स एक्सपर्ट इन गोवा’, ‘ब्लॅक मॅजिक रिमूव्हल स्पेशलिस्ट इन गोवा’ आदी काही या क्षेत्रातील महत्त्वाची संकेतस्थळे आहेत. ‘ब्लॅक मॅजिक रिमूव्हल स्पेशलिस्ट इन गोवा’ या संकेतस्थळाने केलेल्या दाव्यानुसार गोव्यात सध्या द्वेषभावना, स्वार्थ, नकारात्मकता, इतर लोक आनंदी असण्याची स्थिती स्वीकारता न येणे आदी नकारात्मक भावना वाढीस लागल्या आहेत. यावर उपाय म्हणून काळ्या जादूमुळे आपण इतरांना त्रास किंवा इजा पोचवू शकतो. काळ्या जादूला प्रोत्साहन देणार्या एका संकेतस्थळामध्ये म्हटले आहे की, एका मुसलमान ज्योतिष्याला एखाद्याच्या जीवनातील वाईट नष्ट करण्यासाठी प्रशिक्षित करण्यात आलेले आहे. या काळ्या जादूमुळे आपल्या शत्रूला मागे पुरावा न ठेवता नष्ट करता येऊ शकते. वास्तविक एखाद्या जीवनातील वाईट नष्ट होणे कठीण असते आणि यामुळे मुसलमान ज्योतिष्याला निवडणे हा एक चांगला पर्याय आहे.
एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याने याविषयी एका इंग्रजी दैनिकाच्या प्रतिनिधीशी बोलतांना म्हटले, ‘‘गोव्यात काळ्या जादूला प्रोत्साहन देणारी संकेतस्थळे आहेत; मात्र त्यांच्यावर कारवाई करणे हे एक आव्हान आहे. त्यांच्यावर कारवाईसाठी सुसूत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे. अशा संकेतस्थळांवर कारवाईसाठी आम्ही केंद्रशासनाच्या संपर्कात आहोत. पोलिसांनी अशाच प्रकारे ऑनलाईन एस्कोर्ट सेवांवर (वेश्याव्यवसायांवर) कारवाई आरंभली आहे.’’
काळ्या जादूला प्रोत्साहन देणार्या काही संकेतस्थळांच्या लिंक्स
1. https://www.specialistmolviji.in/black-magic-in-goa.html
2. https://www.panditvikramsharma.com/goa/black-magic-specialist.html
3. https://www.vashikaran-baba.com/goa
संपादकीय भूमिकागोवा पोलीस यांवर कारवाई करणार का ? |