पुणे – गुइलेन बॅरे सिंड्रोम (जी.बी.एस्.) या आजाराचा उद्रेक झाल्यानंतर पुणे महापालिकेने शहरातील सर्वच भागांतील पिण्यायोग्य पाण्याची पडताळणी चालू केली. विशेषतः सिंहगड रस्ता परिसरातील पाण्याचे नमुने सातत्याने पडताळण्यात येत आहेत. आतापर्यंत पडताळलेल्या ७ सहस्र १९५ नमुन्यांपैकी १३८ पाणी नमुने पिण्यास अयोग्य आढळले आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाला शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची सूचना करण्यात आली आहे, तसेच आरोग्य विभागाने नागरिकांना पाणी उकळून पिण्याचे आवाहन केले आहे.
राज्यात आतापर्यंत जी.बी.एस्.चे २२४ रुग्ण सापडले असून राज्यभरात १७८ रुग्णांना उपचार करून घरी सोडले आहे, तर आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला असून सर्वाधिक रुग्ण हे पुणे शहरात आढळले आहेत. एकूण रुग्णांपैकी २६ जणांवर अतीदक्षता विभागात उपचार चालू असून १५ रुग्णांना व्हेंटिलेटरवर उपचार चालू आहेत. जेथे दूषित पाणी आढळले, तेथे शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची सूचना पाणीपुरवठा विभागाला देण्यात आल्याचे महापालिकेच्या आरोग्यप्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी सांगितले.
संपादकीय भूमिका‘स्मार्ट सिटी’ असणार्या पुणे येथे शेकडो पाण्याचे नमुने पिण्यास अयोग्य असणे प्रशासनाला लज्जास्पद ! |